नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणारी एक गाडी सिंध नाल्यात कोसळल्याने याठिकाणी भीषण अपघात झाला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात रविवारी ही घटना घडली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवानांना घेऊन जाणारे एक वाहन सिंध नाल्यात कोसळल्याने आठ जवान जखमी झाले आहे. सर्व जखमींना बाहेर काढण्यात आलं असून बालटाल बेस कॅम्प रुग्णालयात नेण्यात आलं, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी भरलेली गाडी बालटाल मार्गे अमरनाथ गुहेकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी हे वाहन सिंध नाल्यात कोसळले. सीआरपीएफ जवानांची गाडी जम्मूमधील नाला सिंधमध्ये कोसळल्याने हा अपघात घडला.
रविवारी सकाळी निलगिरी हेलिपॅडजवळ सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणारे नोंदणी क्रमांक HR36AB/3110 असलेले वाहन सिंध नदीत कोसळल्याने अपघात झाला आहे. यामध्ये आठ जवान जखमी झाले आहेत. त्यांना बालटालच्या बेस कॅम्प रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली आहे. सीआरपीएफची गाडी सिंध नाल्यात कोसळून 8 जवान जखमी झाले आहेत. निलगिरी हेलिपॅडजवळ दी दुर्घटना घडली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, CRPF जवानांना घेऊन जाणारी गाडी रस्त्यावरून घसरून सिंध नाल्यात कोसळल्याने हा अपघात झाला. ही घटना घडली तेव्हा सीआरपीएफचे जवान बालटाल मार्गे अमरनाथ गुहेकडे जात होते.