मुंबई – पावसाळयात सर्वांनाच पावसातचा आनंद घेत फोटो काढण्याचे वेड असते. पावसात एन्जॉय करतांना अनेकदा जीव गेल्याचा घटना घडतात. अशात मुंबईतील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
कम से कम बच्ची की आवाज़ सुन लेते. pic.twitter.com/YQaLgSgejR
— Awanish Sharan 🇮🇳 (@AwanishSharan) July 15, 2023
मुंबईतील बॅण्डस्टॅण्ड समुद्रात पती सोबत फोटो काढताना महिला बुडाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पावसात समुद्र किनाऱ्याच्या काठाववर उभी असलेली मुलगी आई-आई म्हणून ओरडत होती. त्याचवेळी प्रचंड लाटा किनाऱ्यावर येऊन धडकली अशात पती-पत्नी फोटो काढण्यातच मग्न होते अन् तिथेच घात झाला.
यावेळी अचानक मोठी लाट आली आणि किनाऱ्यावरील दगडावर बसलेल्या महिलेला घेऊन गेली. एक कष्ट महिला पाण्यात गडप झाली आणि मुलीच्या आक्रोशाने किनारा हादरला. मुंबईतील बॅण्डस्टॅण्ड समुद्रात पती सोबत फोटो काढताना महिला बुडाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना काही तासांनी महिलेचा मृतदेह सापडला आहे.