रोहित-धोनीशिवाय कर्णधार कोहली काहीच नाही; गंभीर वक्तव्य 

नवी दिल्ली – विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यावर पावसाने पाणी फेरले. दरम्यान, भारताचे दिग्गज क्रिकेटर गौतम गंभीरने कर्णधार विराट कोहलीसंबंधी मोठे वक्तव्य केले आहे.

गौतम गंभीरने म्हंटले कि, मला कोहली फलंदाज म्हणून आवडतो. परंतु, कर्णधार म्हणून नाही. कर्णधार पदाचा मोठा प्रवास कोहलीला अजून गाठायचा आहे. रोहित शर्मा आणि एम.एस. धोनीमुळे विराट कोहली भारतीय संघासाठी चांगला कर्णधार ठरत आहे. विराट जर चांगला कर्णधार असता तर आतापर्यंत रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाला आयपीएलमध्ये विजयी करून दाखविले असते. आठ वर्ष विराट कर्णधारपदी राहूनही आरसीबी आठव्या स्थानावर आहे. विराट कोहलीचा जगातील टॉप चार फलंदाजामध्ये नंबर लागतो. परंतु, कर्णधार म्हणून विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये मोठा फरक आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा पहिला एडिलेड सामन्यात पराभव झाला होता. या सामन्याला तो ड्रॉही करू शकला असता. या सामन्यात कोहलीने आक्रमक शतक झळकावले. यावर कोहलीने म्हंटले होते कि, मी १०० वेळा असाच निर्णय घेईल. कारण मी मॅच ड्रॉ करण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी खेळत होतो. या विधानाचे कौतुक करताना गंभीरने म्हंटले कि, याठिकाणी विराट कोहलीचा विचार १०० नव्हेतर २०० टक्के योग्य होता. या विचारांमुळेच भारतीय संघ अशा स्तरावर पोहचले आहे. ज्याठिकाणी सर्वजण जिंकण्यासाठी खेळतात, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.