नव्या कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी नावे सुचवा

सर्व महासविचांना पक्षाकडून सूचना

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नव्या अध्यक्षपदासाठी पक्षात नव्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. त्यातच अध्यक्षपदासाठी आता देशातील सर्व महासचिवांना नावे सुचविण्यास सांगण्यात आले आहेत. त्यासाठी बंद लिफाफ्यात चार नावे देण्यात यावे असेदेखील म्हटले आहे. कॉंग्रेसचे महासचिव के.सी.वेणूगोपाल यांनी सर्व महासचिवांना याबाबतच्या सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

नव्या अध्यक्षपदासाठी पक्षाकडून सुरू करण्यात आलेल्या या प्रक्रियेसाठी सर्वांनी कंबर कसली आहे. दरम्यान, बंद लिफाफ्यात चार-चार नावे देण्यात यावे अशा स्पष्ट सूचना वेणूगोपाल यांनी सर्व महासचिवांना दिल्या आहेत. सर्व महासचिवांकडून आलेल्या नावानंतर यावर वर्किंग कमिटीचे मतदेखील विचारात घेतले जाणार आहे. तसेच यानंतर वर्किंग कमिटी आणि सर्व महासचिव यांच्यात एक बैठक होणार असून त्यावर संभावित नावाबाबत चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर पुन्हा एकदा वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे.

दरम्यान, अजूनही पक्षात अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ आणि युवा नेता यांच्यावर एकमत झाले नाही त्यामुळे या नव्या पर्यायाचा पक्षाने विचार केला आहे. या पर्यायाने तरी अध्यक्षपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा होईल अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.