पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रात उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा आणि वनसेवा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील एकूण 36 उमेदवारांनी यश संपादन केले आहे.
या स्पर्धा परीक्षा केंद्रात विविध घटकांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश देऊन मार्गदर्शन केले जाते. विषय तज्ज्ञांची व्याख्याने व परीक्षा आयोजित विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. त्यामुळे यूपीएससी व एमपीएससीच्या परीक्षेत विद्यापीठाच्या केंद्रातील विद्यार्थी यश मिळवत असल्याचे दिसून येत आहे. यूपीएससी परीक्षेत सुहास गाडे, ओंकार पवार, अजिंक्य विद्यासागर या उमेदवारांनी यश मिळवले.
एमपीएससी परीक्षेत सूरज जगताप, नूतन पाटील, शुभम मदने, ज्योत्स्ना मुळीक, स्नेहल लाड, स्मार्थ क्षीरसागर, प्रियांका मिसाळ, अविनाश शेंबेटवाड, वृषाली केसकर, पूजा भोईर, आनंद स्वामी, वर्षा कोळेकर, शिरीष वसावे, आरती गवई, पूनम घुले, कुणाल गोंडचवार, प्रतिभा देठे, पूजा पानसरे, अभिजीत थोरात, पायल ठाकूर, सायली चिखलीकर, ओसिन मडकम, बुद्धभूषण निकाळजे यश संपादन केले आहे.
वनसेवा परीक्षेत विलास चेन्नुरी, वर्षा कोळेकर, पूजा पानसरे, सूरज आवारे, निखील देशमुख, गौरेश गडमाडे, रोशनी गोडे, सुमित जाधव, विकेश ठाकरे, अभिजीत थोरात या उमेदवारांनी यश संपादन केले.