मुंबई – अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी २ ऑक्टोबरला म्हणजेच, गांधीजींच्या जन्मदिनीच आपल्या आगामी “गोडसे’ चित्रपटाची घोषणा केली. तर या चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह हे आहेत. महेश मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामला “गोडसे’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.
View this post on Instagram
नथुराम गोडसे यांनीच गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली होती. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासोबत संदीप सिंह यांचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधीच त्यांचे ‘सावरकर’ आणि ‘वाईट’ नावाचे दोन चित्रपट सोबत केले आहेत.
Who is Mahesh Manjrekar … wat is his contribution to Indian Cinema….to seek attention such dramas are needed pic.twitter.com/nf2S1l2CAE
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 2, 2021
दरम्यान, महेश मांजरेकरांच्या या नव्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटावरुन आक्षेप नोंदवला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी आपले मत मांडले आहे. “महेश मांजरेकर कोण आहेत? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान काय?” तसंच लोकांचं लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेलं नाटक असल्याचं आरोपही आव्हाड यांनी केला.