यवतमाळ – पोटच्या मुलाने कॅन्सरग्रस्त आईवर उपचार करण्यास नकार दिला. ऐवढचं नाही तर ती मरण पावल्यावर अंत्यसंस्कारास सुद्धा मुलाने येण्यास नकार दिला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात घडली आहे.
मुलाच्या वडीलांनी आईच्या निधनाची बातमी सांगितल्यावरही मुलाने अंत्यसंस्कारास येण्यास नकार दिला. आर्थिक परिस्थिती आधिच बेताची असलेल्या पतीने कॅन्सरग्रस्त पत्नीच्या उपचारासाठी जीवाचं रान केलं. मात्र वयाच्या 61 व्या पत्नीचे निधन झाले. तिच्या निधनानंतर पतीकडे अंत्यसंस्कारासाठी सुद्धा पेैसे नव्हेत म्हणून हतबल पतीने आपल्या मुलाला यासंदर्भात मदत मागितली. मात्र मुलाने मदत तर सोडाच पण आईच्या अंत्यसंस्काराला सुद्धा येण्यास नकार दिला आहे.
नलिनी बोरकर असे मृत आईचे नाव असून किसनराव बोरकर पतीचे नाव आहे. नलिनी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही किसनराव यांच्याकडे पैसे उरले नव्हते. खिशात केवळ 50 रुपये होते आणि रुग्णालयापासून त्यांचं गाव 300 किमी होते. अशा स्थितीत आपल्या पत्नीचा मृतदेह गावी नेण्यासाठी किसनराव यांनी आपल्या मुलांना फोन करून याबाबत माहिती दिली. पण मुलांनी अंत्यसंस्कारास येण्यास नकार दिला.
दरम्यान, मेडिकलच्या समाजसेवा विभागानं मदत केल्यानंतर कॅन्सरग्रस्त पतीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.