मुंबई – धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल या तिघांना “अपने’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आणले गेले होते. त्याचा पार्ट 2 बनवण्याची घोषणा दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी गेल्या वर्षी केली होती, “अपने 2′ चे शूटिंग या वर्षी एप्रिल महिन्यात सुरू होणार होते, मात्र सध्या पसरलेल्या करोनाच्या साथीमुळे शूटिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
“आपने 2′ यावर्षी दिवाळीमध्ये रिलीज करायचे नियोजन होते, “अपने 2’च्या लीड रोल मध्ये असलेल्या धर्मेंद्र त्यांच्या प्रकृतीचा विचार करून शूटिंग अजून सुरू केले गेलेले नाही.
त्यामुळे रिलीजबाबत आत्ताच चर्चा करणे व्यर्थ आहे. शूटिंग सुरू झाल्यानंतर रिलीज बाबत नव्याने नियोजन केले जाईल असे अनिल शर्मा यांनी म्हटले आहे.