Calcutta Court Calling darling – असं म्हणतात की तोंडातून निघालेला शब्द आणि धनुष्यातून निघालेला बाण कधीच परत घेता येत नाही. याही प्रकरणात तसंच घडलं आहे. एका व्यक्तीने अनोळखी महिलेला डार्लिंग म्हटले. त्यानंतर असे झाले की, त्या महिलेला याचा राग आला, अन् तिने भारतीय दंड संहिताच्या कलम 354ए (आय) अंतर्गत त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. | Calcutta Court Calling darling
यावर कलकत्ता उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. अनोळखी महिलेला ‘डार्लिंग’ म्हणणे चुकीचे असून, तो विनयभंगाचा गुन्हा मानला जातो. अशा कृत्यांना भारतीय दंड संहिताच्या कलम 354ए(आय) अंतर्गत शिक्षा होऊ शकते. या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी घेतल्यानंतर कलकत्ता उच्च न्यायालयाने हा निकाल दिला. | Calcutta Court Calling darling
अज्ञात महिलेला ‘डार्लिंग’ अशा शब्दांनी संबोधणे गुन्हा ठरेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. किमान सध्या तरी आपल्या समाजात प्रचलित असलेले नियम असे नाहीत की रस्त्यावरील पुरुष अनोळखी महिलेसाठी कोणतीही भीती न बाळगता अशा अभिव्यक्तीचा वापर करू शकेल.
पोर्ट ब्लेअर खंडपीठाचे न्यायाधीश जय सेनगुप्ता यांनी जनक राम (आरोपी/दोषी) याची शिक्षा कायम ठेवली. कलम 354ए (स्त्रींच्या विनयशीलतेचा अपमान करणारा) संदर्भ देत न्यायमूर्ती सेनगुप्ता म्हणाले की, ‘ती महिला पोलीस आहे की नाही त्याचा काही संबंध नाही. परंतु, रस्त्यावर अनोळखी महिलेला ‘डार्लिंग’ म्हणणे अपमानास्पद आहे आणि वापरलेला शब्द मुळात अश्लील टिप्पणी आहे. | Calcutta Court Calling darling