Call Forwarding| सरकारने 15 एप्रिलपासून दूरसंचार कंपन्यांना USSD-आधारित कॉल फॉरवर्डिंग थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या 15 एप्रिलपासून ही सेवा बंद होणार आहे. मोबाईल फोनद्वारे होणारी फसवणूक आणि ऑनलाइन गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. या सेवा पर्यायी पद्धतींनी पुन्हा सुरू करता येतील, असेही आदेशात म्हटले आहे.
दूरसंचार कंपन्यांकडून USSD आधारित अनेक सेवा प्रदान केल्या जातात. यामध्ये IMEI सुविधेपासून ते बॅलन्स चेक करण्यापर्यंतच्या सुविधांचा समावेश आहे. यातील एक सेवा म्हणजे कॉल फॉरवर्डिंगची सुविधा आहे. परंतु ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, ही सेवा बंद करताना यासाठी पर्यायी सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील सरकारने दूरसंचार कंपन्याना दिल्या आहेत. विभागाने 28 मार्च रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, SSSD (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा) आधारित कॉल फॉरवर्डिंग सुविधेचा काही अयोग्य कामांसाठी गैरवापर होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.
या संदर्भात सक्षम प्राधिकरणाने सर्व विद्यमान यूएसएसडी-आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा पुढील सूचना येईपर्यंत 15 एप्रिल 2024 पासून बंद केल्या जातील, असा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा:
कपिल शर्माच्या शोमध्ये खोटं हसते अर्चना पुरण सिंह? स्वत: केला खुलासा