नवी दिल्ली: दिल्लीच्या प्रतापगंज भागात काल सकाळी मोटारीतून आपल्या पतीला डायलिससाठी घेऊन जाणाऱ्या एका 59 वर्षीय महिलेची अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रकार घडला आहे.
ही महिला चार्टर्ड अकाऊंटट आहे. ती आपल्या पतीला घेऊन मोटारीतून रूग्णालयाकडे चालली होती. वाटेत तीचे पती शनि मंदिरात दर्शनासाठी गेले असतानाच मारेकऱ्यांनी हा डाव साधला आणि तिच्यावर जवळून गोळ्या घातल्या. त्यात ती जागीच ठार झाली. पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यावरून मारेकऱ्यांचा माग काढला जात आहे. व्यक्तिगत शत्रुत्वातून ही हत्या झाली असावी असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. उषा सहानी असे या महिलेचे नाव आहे.