FA Cup 2024 Final : मँचेस्टर युनायटेडने गतविजेत्या मँचेस्टर सिटीचा 2-1 असा पराभव करत एफए कप फुटबॉलचे विजेतेपद पटकावले. यासह युनायटेड पुढील मोसमासाठी युरोपा लीगसाठी पात्र ठरले. अंतिम फेरी गेल्या वर्षीची पुनरावृत्ती होती जी सिटीने 2-1 ने जिंकली होती.
2023- @ManCity 2-1 @ManUtd
2024- @ManCity 1-2 @ManUtd2-1 is clearly the magic scoreline when the Manchester clubs face off in the #EmiratesFACup Final 😂 pic.twitter.com/IuP4Vb0fd1
— Emirates FA Cup (@EmiratesFACup) May 26, 2024
मँचेस्टर युनायटेडकडून अजांद्रो (30व्या मिनिटाला) आणि कोबी मेन्यूने (39व्या मिनिटाला) गोल केले. मँचेस्टर सिटीसाठी जेरेमीने (87व्या मिनिटाला) एकमेव गोल केला. युनायटेडचा हा 13वा एफए कप आहे. सर्वाधिक विजेतेपदाचा विक्रम आर्सेनलच्या (14एफए कप) नावावर आहे.