IPL 2024 (KKR vs SRH, Final Match Toss Update) : आज IPL 2024 चा अंतिम सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दोन्ही संघ आमनेसामने येण्याची वेळ आली आहे. IPL 2024 चा अंतिम सामना लवकरच सुरु होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ चेपॉकला पोहोचले आहेत.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा (Toss Update) सनरायझर्स हैदराबाद संघाच्या बाजूनं लागला आहे. अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Sunrisers Hyderabad Won the Toss & elected to bat) त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला आहे.
🚨 Toss Update 🚨
Sunrisers Hyderabad 🧡 elect to bat in the #Final against Kolkata Knight Riders 💜
Follow the Match ▶️ https://t.co/lCK6AJCdH9#TATAIPL | #KKRvSRH | #TheFinalCall pic.twitter.com/f4PWxfLFEK
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024
या हंगामात केकेआर संघ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. श्रेयस अय्यरच्या संघाने साखळी फेरीत प्रथम हैदराबादला पराभूत केले होते आणि नंतर पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यांना वाईट रीतीने पराभूत केले होते. अशा स्थितीत त्यांचे मनोबल आजही उंचावलेले राहील. मात्र, सनरायझर्सकडे अनेक गेमचेंजर खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत त्याला हलके घेणे केकेआरला महागात पडू शकते.
कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील अंतिम सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. येथील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. अशा स्थितीत खेळपट्टीच्या बाबतीत केकेआरचा वरचष्मा दिसतो. वास्तविक, दोन्ही संघांच्या फिरकीपटूंवर नजर टाकली तर कोलकाताकडे उत्कृष्ट दर्जाचे फिरकी गोलंदाज आहेत. यामध्ये वरुण चक्रवर्तीने 20 आणि सुनील नरेनने 16 विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स आतापर्यंत 27 वेळा आमनेसामने आले आहेत. या 27 सामन्यांमध्ये केकेआरने 66 टक्के प्रसंगी विजय मिळवला आहे हे आश्चर्यकारक आहे. कोलकाता 18 वेळा जिंकला आहे, तर SRH फक्त 9 वेळा जिंकू शकला आहे.