Nashik News – राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये आयकर विभागाने अनेक कारवाया केल्या आहेत. नुकतेच, आयकर विभागाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली. नाशिकच्या एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित असलेल्या एका धाडीमध्ये तब्बल 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आला. प्राप्तिकर विभागाने केलेल्या या कारवाईमुळे नाशिकमध्ये चांगलीच एकच खळबळ उडाली.
नाशिक, नागपूर आणि जळगावच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे सदर कारवाई केली. यावेळी विभागाकडून तब्बल 26 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना 14 ते 15 तास लागले. एकूण 30 तास ही कारवाई सुरु होती.
यावेळी 500 रुपयांच्या नोटांचा अक्षरशः खच पाहायला मिळाला. ही रक्कम मोजण्यासाठी एकूण 7 गाड्या मागवल्या होत्या. सुराणा ज्वेलर्स यांच्याशी संबंधित असलेल्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापा टाकण्यात आला. तसेच, त्यांच्या राका कॉलनीमधील बंगल्यातही स्वतंत्र पथकाने तपासणी केली.
यावेळी 50 ते 55 अधिकारी या छाप्यात सहभागी होते. त्यांचे शहरामध्ये असलेले कार्यालय, खासगी लॉकर्स तसेच बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले. त्यांच्याशी संबंधित असलेल्या मनमाड आणि नांदगावमधील कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करण्यात आली.
नाशिक शहरामध्ये एका सराफा व्यावसायिकाकडे मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता समपडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.