नवी दिल्ली – जपानची कार उत्पादक कंपनी होंडाच्या या कारच्या काही भागात खराबी आढळून आली आहे त्यामुळे ही कंपनी भारतात 3669 कार दुरुस्त करून देणार आहे.
जागतिक पातळीवर या कारमधील बॅगमध्ये खराबी असल्याचे आढळून आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतातील 3669 कारमधील ही खराबी दुरुस्त करून देण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. यासंबंधात आमच्याकडे तक्रारी आल्या नव्हत्या मात्र ही खराबी आम्हाला आढळून आल्यामुळे आम्ही स्वतः होऊन ही दुरुस्ती करून देत आहोत असे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीने 2003-2006 या काळात तयार केलेल्या काही कारमध्ये ही खराबी आढळून आली आहे. कंपनीच्या देशभरातील वितरकांच्या माध्यमातून ही दुरुस्ती विनामूल्य करून देण्यात येणार आहे. ज्या ग्राहकांच्या कारमध्ये खराबी आढळून आलेली आहे त्या ग्राहकांनी वितरकाकडे संपर्क साधावा. जागतिक पातळीवर कंपनी लाखो कारमध्ये ही दुरुस्ती करून देणार आहे. खराब कारमधील एअर बॅग सक्रिय झाल्यानंतर आवश्यकतेपेक्षा जास्त दबाव निर्माण होतो.