पुणे: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. पुणे विभागीय शालेय हॅंडबॉल (मुले/मुली 19 वर्षाखालील) स्पर्धेत अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने दोन्ही गटांत विजेतेपद मिळविले.
मुलांच्या अंतिम सामन्यात पुणे शहर (अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर) विजयी विरुध्द सोलापूर शहर (दयानंद कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर) संघाचा 25-18 असा पराभव केला. विजयी संघाकडून दत्तात्रय पिलाणे 8 गोल, दीपक बोराडे 4 गोल, गोपाल साबावट 4 गोल, दीपक आतकरे 3 गोल, रोहन खुणे 3 गोल, ओंकार हरपळे 2 गोल, गौरव स्वामी 1 गोल व गोलकिपर विशाल जैसवार यांनी सुरेख खेळ केला.
उपांत्य सामन्यात पुणे शहर (अण्णासाहेब मगर महाविद्यालय) विजयी विरुद्ध सोलापूर जिल्हा (भारत हायस्कूल, जेऊर) संघाचा 31-22 असा पराभव केला तर सोलापूर शहरने (दयानंद महाविद्यालय) पुणे जिल्हा (श्री शिवछत्रपती महाविद्यालय, जुन्नर) चा 25-13 पराभव केला.
मुलींच्या अंतिम सामन्यात पुणे शहर (अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर) पुणे जिल्हा संघाचा (विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय) 22-11 असा पराभव केला. विजयी संघाकडून मयुरी सुरवसे 8 गोल, धनश्री ढमाळ 7 गोल, भगवती शिंदे 3 गोल, मयुरी धेंडे 2 गोल, तेजश्री निकते 2 गोल, गोलकीपर प्रांजली चव्हाण, प्राजक्ता ढमढेरे यांनी चांगला खेळ केला.