भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग यांनी स्पष्ट केली भूमिका
बिजींग – चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग 11 ऑक्टोबर पासून भारत भेटीवर येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांना चीनच्या दौऱ्यावर बोलावून त्यांच्याशी चर्चा केली.
काश्मीर विषयावर आमचे लक्ष असून महत्वाच्या विषयावर आम्ही पाकिस्तानच्या पाठीशी आहोत असे जिनपिंग यांनी स्पष्ट केले आहे. ऐन भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला जाहींर पाठिंबा देण्याच्या विषयाला महत्व दिले जात आहे.
काश्मीरच्या विषयावर शी जिनपिंग यांनी पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला असला तरी काश्मीर विषय दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी आपसात चर्चा करून सोडवण्याला आपले प्राधान्य असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान शी जिनपिंग यांच्या प्रस्तावित भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर चीन सरकारच्यावतीने एक निवेदन प्रसिद्धला देण्यात आले आहे त्यात दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने अधिक व्यापक चर्चा होईलअशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.