पुणे – पुरुषोत्तम, सवाई, उत्तुंग, प्रबोधन, दाजीकाका गाडगीळ करंडक अशा सांघिक पारितोषिकासहित चाळीस वैयक्तिक पारितोषिके विजेत्या प्राणिमात्र आणि ३०० मिसिंग या दोन एकांकिकांचे प्रयोग पाहावयास मिळणार आहेत. भरत नाट्य मंदिर येथे दि १३ ऑक्टोबर रोजी ९.३० वाजता दोन्ही प्रयोग होणार आहेत.
अभिनेता क्षितिश दाते दिग्दर्शित प्राणिमात्र एकांकिकेने २०१२ साली पुरुषोत्तम करंडक पटकावला होता. त्यानंतर उत्तुंग, प्रबोधन, अशा स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिकाचा मान मिळवला आहे. तर दिग्दर्शन, अभिनय, काकाजी, सर्वोत्कृष्ट लाईट्स, म्युजिक, नैपथ्य अशी २१ वैयक्तिक पारितोषिके मिळवली आहेत.
यश रुईकर दिग्दर्शित एका परदेशी चित्रपटाच्या जादूगाराची कथा उलघडून दाखवणारे ३०० मिसिंग या एकांकिकेने २०१६ साली पुरुषोत्तम करंडक मिळवला होता. त्याबरोबरच दाजीकाका गाडगीळ करंडक, लोकांकिका, सवाई, अशा स्पर्धेत प्रथम स्थान मिळवले आहे. दिग्दर्शन, अभिनय अशी २० वैयक्तिक पारितोषिके मिळवली आहेत.