लोणी काळभोर-हवेली तालुक्यातील दोन मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावे परंपरे प्रमाणे एक गाव एक शिवजयंती या संकल्पनेवर आधारित एकच शिवजयंती यंदाही साजरी करणार आहेत.
शिवजयंती निमित्त पारंपारिक वाद्यांच्या गजरात बुधवारी (दि. 19) दुपारी तीन ते रात्री आठ दरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीपाट टोलनाका येथून ही शोभायात्रा सुरू होणार आहे. वाकवस्ती, कदमवस्ती, लोणी स्टेशन, लोणी काळभोर फाटा, गाव या मार्गे जाऊन ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ मंदिरात या शोभायात्रेचा समारोप होईल. परिसरातील नागरिकांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन लोणी काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामस्थांनी केले आहे.