भोर, (प्रतिनिधी) – भोर येथील वाघजाई सांस्कृतिक सभागृहात शिवजयंतीच्या निमित्ताने शिवतेज युवा प्रतिष्ठान भोर यांच्या वतीने शिवतेज करंडक राज्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. लक्ष्मण अवघडे, राजेंद्र चौघुले यांच्या हस्ते करण्यात आले.
परीक्षक म्हणून प्रा. माधवी कडू, समृद्धी गोळे, प्रा. संगीता कामठे यांनी काम पाहिले. प्रा. सोमनाथ कुंभार, प्रा. सुभाष भेलके, प्रा.राहुल शेटे, प्रा. संजय कडू, भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.विजय जाधव यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
अध्यक्ष प्रसाद टापरे, सचिव साहिल कारळे, खजिनदार जया शिवतरे, प्रतीक्षा पोळ, सिद्धेश नांगडे, प्राप्ती पिलाणे, शिवाजी सावंत, गणेश दिघे स्पर्धेचे नियोजन केले. अभिनेत्री अंकिता शिवतरे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – लहान गट : प्रथम- अभिषेक दानवले (सन ब्राईट स्कूल, पुणे) द्वितीय समृद्धी माचुत्रे (विजय आठवले माध्यमिक विद्यालय, माळेगाव) तृतीय राजेश खोमणे, संगमनेर – न्यू इंग्लिश स्कूल संगमनेर, उत्तेजनार्थ प्रणाली शेडगे (संत लिंगनाथ स्वामी माध्यमिक विद्यालय,भोंगवली) कृपा दळवी (अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर) मोठा गटात- प्रथम चैतन्य बावधने (फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे) द्वितीय धर्मेश हिरे (व्ही डबल्यु एस महाविद्यालय धुळे) तृतीय तेजस पाटील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे) उत्तेजनार्थ शिवानी कांबळे (फर्ग्युसन महाविद्यालय पुणे) रमेश कचरे( सर परशुराम महाविद्यालय,पुणे).