अंबानींच्या वकिलांची ब्रिटनच्या न्यायालयात माहिती
नवी दिल्ली : रियालन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे एकेकाळी धनाढय उद्योगपती होते, मात्र भारतातील दूरसंचार बाजारपेठेत अनर्थपूर्ण घडामोडी घडल्याने अंबानी आता धनाढय नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी शुक्रवारी ब्रिटनमधील न्यायालयात स्पष्ट केले.
चीनमधील अग्रगण्य बॅंकांनी अनिल अंबानी यांच्याकडून 680 दशलक्ष डॉलर रक्कम वसूल करण्यासाठी न्यायालयात धाव आहे. त्यानुसार त्याबाबतच्या सुनावणीच्या वेळी वकिलांनी वरील बाब न्यायालयात स्पष्ट केली.
अनिल अंबानी यांनी 2012 मध्ये 925 दशलक्ष डॉलरच्या कर्जाला वैयक्तिक हमी दिली होती. त्याबाबतचा तपशील देण्याची मागणी दी इंडस्ट्रियल ऍण्ड कमर्शिअल बॅंक ऑफ चायना लि., मुंबई शाखा, चायना डेव्हलपमेण्ट बॅंक आणि एग्झिम बॅंक ऑफ चायना यांनी केली आहे. मात्र, अशा प्रकारच्या कोणत्याही हमीसाठी अधिकार दिल्याचा अनिल अंबानी यांनी इन्कार केला आहे. याच प्रकरणी आता बिटनच्या न्यायालयात सुनावणी करण्यात येत आहे. या सुनावणीदरम्यान अंबानींच्या वकिलांनी अंबानी धनाढ्य राहिले नसल्याची माहिती दिली.