“बर्निंग कार’चा कांदळी थरार

आळेफाटा-कांदळी (ता. जुन्नर) येथे मारुती कारने अचानक पेट घेतल्यामुळे ही कार जळून खाक झाली. ही घटना शुक्रवारी ( दि.8) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपळवंडी (भटकळवाडी) येथील रहिवासी बाळू शांताराम काचळे यांचा सुतारठिके येथे किराणा माल विक्रीचा व्यवसाय आहे. ते त्यांची मारुती कार (एमएच 14 एच 4478) घेऊन वडगाव कांदळीकडे जात असताना कांदळी गावच्या हद्दीत त्यांच्या गाडीचे पेट्रोल संपले होते व गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून त्यांनी पेट्रोल आणून गाडीत टाकले व गाडी चालू करण्यासाठी स्टार्टर मारला असता गाडीने अचानक पेट घेतला. तेथील नागरिकांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र ही आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे विझू शकली नाही. या घटनेत गाडी पूर्ण जळाल्यामुळे काचळे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाळू काचळे यांनी दहा ते पंधरा दिवसांपूर्वीच ही मारुती कार खरेदी केली होती; परंतु दूर्दैवाने ही घटना घडली. ही आग शॉकसर्किटमुळे लागली असल्याचे कांदळी गावचे माजी उपसरपंच सुनिल गुंजाळ यांनी सांगीतले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×