दावडी-दोन दिवसांत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्यानंतर खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी व परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्यात आले.
उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पावसाने शेतातल्या अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच अनुषंगाने विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी पाहणी दौरा केला होता. यामध्ये दावडी गावात सुमारे 250 हेक्टरवर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे 8 कोटी रुपयांचे 1500 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळं शेतकरी अडचणीमध्ये सापडला आहे. या भागातील शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडाला आहे. यावेळी शेतातील पिकाचे झालेले नुकसान पाहून पंचनामा करण्यात आले आहे. यावेळी तलाठी सतीश शेळके, कोतवाल देवा ओव्हाळ, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे, माजी सरपंच संगीता होरे, शिवसेना नेते संतोष सातपुते, शेतकरी किसन डुंबरे, वसंत डुंबरे, प्रसाद डुंबरे शेतकरी उपस्थित होते.