मुंबई – हॉलिवूड अभिनेता ‘विल स्मिथ’चे जगभर लाखो फॅन्स आहेत. आजवर अनेकांनी त्याला हॉलिवूड सिनेमांमध्ये अॅक्शन आणि स्टंट करताना पाहिलं असेल. पण नुकतंच विल स्मिथने डोकं चक्रावून टाकणारं धाडस केलं आहे.
जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असलेल्या ‘बुर्ज खलिफा’च्या शिखरावर विल स्मिथ उभा असल्याचे दिसले. यूट्यूब शो ‘बेस्ट शेप ऑफ माय लाइफ’च्या एक एपिसोडसाठी विल बुर्ज खलिफा इमारतीच्या शिखरावर पोहोचला होता.
ड्रोनच्या मदतीने विलचे काही फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले आहेत. सोशल मीडियावर विल स्मिथचे जबरदस्त फोटो पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले.
बुर्ज खलिफा ही इमारत तब्बल 160 मजली असून 2,722 फूट उंच आहे. आपण हा व्हिडिओ पहिला तर यामध्ये विल स्मिथ बुर्ज खलिफाच्या शिखरावर हात पसरून कसा उभा आहे.
यावेळी तो हसताना दिसला. तसेच तो इमारतीच्या वरच्या बाजूला बसलेलाही दिसते. खास या शूटिंगसाठी विल स्मिथ लॉस एंजेलिस येथून दुबईला आला होता.
विल स्मिथने हॉलिवूडमधील ‘मेन इन ब्लॅक, स्टुडंट ऑफ द इयर 2, बॅड बॉईज सिरीज, हॅंकॉक, आफ्टर अर्थ आणि फोकस’ सारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.