मुंबई – भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच मॅचफिट होत असून भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्प्रधेद्वारे भारतीय संघात पुनरागमन करेल, असा विश्वास बीसीसीआयने व्यक्त केला आहे. जवळपास एख वर्षापासून तो संघाबाहेर आहे.
त्याला पाठीच्या दुखापतीमुळे अनेक महत्वाच्या स्पर्धा तसेच मालिकांमधून माघार घ्यावी लागली होती. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) त्याचे तंदुरुस्ती प्रमाणपत्रही मध्यंतरी दिले होते. मात्र, नेटमध्ये गोलंदाजी करताना त्याला त्रास होत असल्याचे जाणवल्यामुळे त्याला पुन्हा एकदा एनसीएमध्ये पाठवण्यात आले.
तसेच त्याच्यावर शस्त्रक्रीयाही केली गेली. त्यानंतर आता तो तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर असून विश्वकरंडक स्पर्देपूर्वी तो मॅचफिट ठरेल, असा विश्वास बीसीसीआयने व्यक्त केला आहे.