बॉलीवुड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या रोमांटिक चित्रपटात आपले नशिब आजमावित असून आथिया शेट्टीसोबतचा “मोतीचूर चकनाचूर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. छोटया शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबियांवर आधारित या फॅमिली कॉमेडी चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बंपर ओपनिंग करत 4 कोटींचा गल्ला जमविला.
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आथिया शेट्टी यांच्या “मोतीचूर चकनाचूर’मध्ये संपूर्ण फॅमिली ड्रामा आहे. ज्यामध्ये छोट्या शहरातील दोन शेजारांची कथा आहे. चित्रपटात असे छोटे-छोटे क्षण दाखविण्यात आले आहेत, जे आपण हळूहळू मागे सोडत जातो. चित्रपटात, खूप गोड क्षणांमधून हसवण्याचाही प्रयत्न केला गेला आहे. “मोतीचूर चकनाचूर’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आथिया शेट्टी यांच्यात एक मनोरंजक केमिस्ट्री असलेली स्टोरी आहे.
दरम्यान, या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला आहे. तसेच नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आथिया शेट्टी या जोडीलाही चांगली पसंती मिळत आहे. “मोतीचूर चकनाचूर’ने पहिल्याच दिवशी चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांची रांग लावल्याने पुढील दिवसांमध्ये अधिक कमाई होवू शकते.