मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेल्या “भोसले’ला बार्सिलोना इथे झालेल्या एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपट महोत्सवात “भोसले’ला सर्वोत्कृष्ठ कथानक आणि सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे.
“भोसले’ही एका पोलिस हवालदाराची कथा आहे आणि ही मुख्य भूमिका मनोज वाजपेयीने साकारली आहे. हा पोलिस हवालदार प्रवासी आणि स्थानिक नेत्यांमधील संघर्षादरम्यान प्रवाशांना मदत करत्तो.
मनोज वाजपेयेने ही आव्हानात्मक भूमिका ताकदीने पेलली आहे. आशियाई चित्रपट महोत्सवात आपली ओळख निर्माण करणे एवढेच आपले उद्दिष्ट नव्हते. तर तिथे पुरस्कार मिळवून आपल्या देशातील कलेचा परदेशात सन्मान करणे हे आपले उद्दिष्ट होते, असे दिग्दर्शक देवाशीष मखीजाने सांगितले.
“भोसले’ सिनेमातील प्रवाशांशी संबंधित समस्या ही आज काल आशिया खंडातील प्रमुख समस्या आहे, असेही त्यांनी सांगितले. नावावरून तरी हा सिनेमा महाराष्ट्रातील पार्श्वभुमीवर चित्रीत असावा असे वाटते. कारण भोसले हे आडनाव महाराष्ट्रातच अधिक प्रसिद्ध आहे. या सिनेमातील अन्य तपशील पुढे यायचा आहे.