आर्यनचा मोबाईल जप्तच केला नाही, मग एनसीबी व्हॉटसअप चॅट कस दाखवतय? वकिलांचा युक्तिवाद

मुंबई – क्रुजवरील ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या आर्यन खान यांच्या जामिनासाठी आज न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणात कोर्टा बाहेर मोठ्या प्रमाणात धुराळा उडाला आहे. यावर आज न्यायालयात सुनावणीवेळी आर्यनचे वकिल आणि भारताचे माजी अटर्नी जनरल मुकील रोहतगी यांनी बाजू मांडली.

रोहतगी म्हणाले की, आर्यन कैलिफोर्नियात शिकतो. तो क्रुझवरून गोव्याला जात होता. त्यानं तिकीट काढलेलं नव्हतं, त्याला आमंत्रण दिलं गेलं होतं. क्रुझवर एका कार्यक्रमासाठी तो पाहुणा म्हणून आला होता. मित्र अरबाझ मर्चंटसोबत तो जात होता. तसेच आर्यनकडे काहीही सापडलं नसून अरबाझच्या बुटात ड्रग्ज सापडल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

आर्यनकडे काहीही सापडलं नसताना, त्याला पकडण्याचं काहीच कारण नव्हतं. मात्र पोलिसांनी अधिकारांचा दुरूपयोग करत आर्यनला अटक केली. आर्यनची कोणतीही वैद्यकीय चाचणी झालेली नाही. त्यामुळे आर्यनचा या अंमली पदार्थांशी संबंध असल्याचा एकही पुरावा नाही. मग आर्यनला कस जबाबदार धरता येईल, असा प्रश्न रोहतगी यांनी उपस्थित केला.

दरम्यान आर्यनला गोवण्यासाठी एनसीबीनं 2018 पासूनच्या व्हॉट्सअपचा संदर्भ जोडला आहे या चॅटमधनं काहीही सिद्ध होत नाही. एनसीबीसाठी तो महत्त्वाचा पुरावा असेल मात्र त्याचा या घटनेशी कुठेही संबंध लागत नाही, असा दावा रोहतगी यांनी केला. तसेच आर्यनचा मोबाईल जप्त केला नाही तर मग व्हाटसप चॅट कोणत्या आधारावर NCB दाखवत आहे. आता यापूर्वीचे काही संदर्भ जोडून आर्यन अमली पदार्थांचं सेवन करतो हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र त्यामुळे या घटनेत आर्यन आणि अमली पदार्थांचा संदर्भ कसा जोडता येईल ? असा थेट सवाल रोहतगी यांनी उपस्थित केला.

आर्यनचा हस्तगत केलेल्या अंमली पदार्थांशी काहीही संबंध नाही. त्याचा या खरेदीतही कुठे संबंध असल्याचे पुरावे नाहीत, त्यानं यासाठी कुणालाही पैसे दिलेले नाहीत जर कमी प्रमाणात अंमली पदार्थ सापडले असतील तर त्या आरोपीला जेलमध्ये टाकलं जात नाही. त्याला सुधारण्याची संधी दिली जाते. इथे तर आर्यनकडे काहीच सापडलेलं नाही तरीही आर्यन 20 दिवसांपासून तुरूंगात आहे, याकडे रोहतगी यांनी लक्ष वेधले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.