म्हशीला कुत्र चावलं आणि अख्खा गाव दवाखान्यात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील शिये येथे एका म्हैशीला पिसाळलेल कुत्र चावले होते. त्या म्हैशीचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. वैद्यकीय अहवालातून त्या म्हैशीला रेबीज झाल्याचे समोर येताच, शिये गावातील ग्रामस्थांची घाबरगुंडीच उडाली. या म्हैशीचे दूध ज्यांनी घरी वापरले होते त्या शेकडो ग्रामस्थांनी रेबीजची लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली होती.

सहा महिन्यांपूर्वी शिये गावातील हनुमान नगर येथील एका शेतकऱ्याच्या म्हैशीला पिसाळलेले कुत्रे चावले होते. 4 दिवसापूर्वी ही म्हैस मृत्यूमुखी पडली आहे. गावातील शेकडो नागरिक या म्हैशीचे दुध आपल्या घरी वापरण्यासाठी घेवून जात होते. जे लोक हे दूध घेवून जात होते त्यांना ही माहीती कळताच त्यांची बोबडीच वळाली. या भीतीपोटी गावातील शेकडो ग्रामस्थांनी रेबीज लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रासह कसबा बावड्यातील सेवा रूग्णालयात मोठी गर्दी केली होती.

ही माहिती संबंधीत शासकीय विभागांना कळताच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शासकीय यंत्रणा गतीमान झाली. नागरिकांनी दूध उकळून घेतलं असेल तर कोणताही धोका नाही. मात्र कच्चे दुध घेतले असल्यास संबंधीतांना रेबीजची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या लोकांनी कच्चे दुध घेतले आहे त्यांना रेबीजची लस घेण्याची आवश्यकता असून, ही लस आरोग्य उपकेंद्रात मोफत उपलब्ध करण्यात आलं आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here