पिंपरी – महापालिकेच्या सन 2021-22 च्या अंदाजपत्राकाची विशेष सर्वसाधारण सभा उद्या (दि.26) दुपारी दोन वाजता आयोजित केली आहे. सभा ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे.
महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी 5 हजार 588 कोटी 35 लाखांचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष संतोष लोंढे यांच्याकडे 18 फेब्रुवारीला सादर केला होता. केंद्र व राज्य शासनांच्या योजनांसह एकूण 7 हजार 112 लाखांचे अंदाजपत्रक आहे. या अंदाजपत्रकात 250 कोटींच्या उपसूचना देऊन स्थायी समितीने 24 फेब्रुवारीला मंजुरी देत महासभेकडे शिफारस केली होती.
अंदाजपत्रकावर आज होणाऱ्या सभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यात आणखी किती उपसूचना स्वीकारल्या जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.