पाकिस्तानी बोटी गुजरातच्या किनारपट्टीवर पकडल्या

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दल गुजरात किनार पट्टीवर राबवत असलेल्या शोध मोहिमेत पाच पाकिस्तानी बोटी जप्त करण्यात आल्या.

या बोटी मासेमारी करणाऱ्या होत्या. त्यात काही आक्षेपार्ह सापडले नाही मात्र तरीही हि मोहीम राबवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सागरी मार्गाने धसत्वादी हल्ला करण्याचा कट पाकिस्तानातं रचला जात असल्याचे संदेश गुप्तचर यंत्रणांनी पकडले होते.

त्यामुळे सागरी किनारपट्टीवरील गस्त वाढवण्यात आली आहे. गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यांत असे हल्ले होऊ शकतात. असा सर्तकतेचा आदेश देण्यात आला होता.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.