सविंदणे – निमोणे ता. शिरूर येथील मोटेवाडीमध्ये आपल्या मुलीकडे काही दिवसांपुर्वी वास्तव्यास आलेले मनोहर चंदरराव शितोळे रा. सांगवी सांडस, ता. हवेली, जि. पुणे यांचा निमोणे – मोटेवाडी रोडलगत अज्ञात इसमाने त्यांच्या चेहऱ्यावर, कमरेवर, पाठीवर, गुप्तांगावर ठिकठिकाणी मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करून त्यांचा निर्घृनपणे खुन केला आहे. त्याबाबत त्यांचा मुलगा राजाराम मनोहर शितोळे रा. सांगवी सांडस, ता. हवेली, जि. पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये रितसर फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ०२ फेब्रुवारी रोजी ०८ वाजण्यापासून ते दि. ०४ फेब्रुवारी रोजी दुपारी ०१ वा वाजण्याच्या सुमारास मौजे निमोणे येथील निमोणे -मोटेवाडी रोडलगत नानासाहेब कुंडलिक काळे यांच्या शेतजमीन गट नं ६१९ मधील ऊसाच्या शेतामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून फिर्यादीचे वडील मनोहर चंदरराव शितोळे ( वय -७१ वर्षे )रा.सांगली सांडस, ता. हवेली, जि. पुणे यांच्या चेहऱ्यावर, कमरेवर, पाठीवर, गुप्तांगावर ठिकठिकाणी मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करून त्यांचा खुन केला आहे.
हा खुण कुणी व कशासाठी केला याचा शोध शिरूर पोलिस घेत असून या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप यादव हे करत आहे. चौकट – शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या महीन्यात उरळगाव येथे महिलेचे अर्धवट जळालेले प्रेत सापडले होते. त्या महीलेची अद्याप ओळख पटली नसून या खुणाच्या गुन्हयासह या दोन गुन्हयांची उकल होणे शिरुर पोलिसांपुढे आव्हाण बनले आहे.