नवी दिल्ली : केरळ न्यायालयाने एक निर्णय सुनावला आहे. एका व्यक्तीला आपल्या चुलत बहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने तब्बल 135 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यासोबतच 5 लाखांचा दंडदेखील ठोठावला आहे. दोषीने आपल्या चुलत बहिणीवर अनेकवेळा बलात्कार केला आणि त्यातूनच ती गरोदरही ठेवल्याचा आरोप सिद्ध झाले आहेत. पीडितेने बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली मुलाला जन्म दिल्याचे वकिलांनी न्यायालयात सांगितले आहे.
हरिपाद फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाचे न्यायाधीश साजी कुमार यांनी 24 वर्षीय तरुणाला लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि बाल न्याय कायदा या कायद्यांतर्गत दोषी ठरवले असून कायद्यांतील तरतुदींनुसार वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत.
सरकारी वकील रघु के यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना, सर्व प्रकरणांमध्ये, दोषीला एकूण 135 वर्षांची शिक्षा झाली आहे. तसेच, सर्व शिक्षा एकाचवेळी चालतील, असेही ते म्हणाले.
केरळमधील न्यायालयानं दोषी व्यक्तीला 5.1 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. घटनेच्या वेळी 15 वर्षांच्या असलेल्या अल्पवयीने पीडितेला 4 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला न्यायालयाकडून देण्यात आले होते.