करोना विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जगभरात या विषाणूने थैमान घातला आहे. करोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. यामध्ये आता एका ब्रिटिश अभिनेत्रीचाही समावेश झाला आहे. ब्रिटीश अभिनेत्री हिलरी हीथ यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
अभिनेत्री हिलरी हीथचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांचा धर्म-पुत्र ऍलेक्स विलियम्सने फेसबुकच्या माध्यमातून दिली.
इंग्लंडच्या लिवरपूलमध्ये हिलरी हीथ यांचा जन्म झाला होता. त्या 74 वर्षाच्या होत्या. हिलरी या हॉरर चित्रपटामधील त्यांच्या सारा लोवेस या भूमिकेसाठी ओळखल्या जातात. त्यांनी 1968 मध्ये अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. हा त्यांचा पहिला सिनेमा होता. हिलरी या अनेक प्रसिद्ध सिनेमा आणि टीव्ही-शोच्या निर्मात्याही होत्या.
त्यांचे पहिले पती डंकन हीथ यांच्याशी 1989 मध्ये घटस्फोटानंतर त्यांनी अनेक सिनेमांची निर्मिती केली. हिलरी या लंडन स्टेजसोबतही जोडलेल्या होत्या. त्यांना लॉरा हीथ आणि डॅनिअल हीथ ही दोन मुले आहेत.