ब्रिस्बेन : अमेरिकेची दिग्गज टेनिस महिला खेळाडू व्हीनस विल्यम्सने हिने दुखापतीमुळे ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्याऐवजी पर्यायी खेळाडूची घोषणा करण्यात येणार आहे. याबदलची माहिती ब्रिस्बेन स्पर्धा आयोजकांनी ट्विटरवरून दिली आहे.
Main draw update for Brisbane International 2020: Former world No.1 Venus Williams (USA) has withdrawn from the tournament. A wildcard announcement will be made asap. #brisbanetennis
— Brisbane International (@BrisbaneTennis) December 31, 2019
३९ वर्षीय व्हीनस हिला बुधवारी सराव करताना दुखापत झाली. ब्रिस्बेन ओपन टेनिस स्पर्धा ही ६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर यदांच्या मोसमातील पहिली आॅस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा २० जानेवारीपासून सुरू होणार आहे.
सातवेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या व्हीनसने म्हटले आहे की, ” सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे मी ब्रिस्बेन टेनिस स्पर्धेत खेळू शकणार नाही पण आशा आहे की, मी आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये नक्की खेळेल”.
दरम्यान, आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेसाठी पूर्णपणे तंदुरूस्त राहण्यासाठी अखेर व्हीनस विल्यम्सने ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून माघार घेतली.