मुंबई – मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात शुक्रवारी अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला.
आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. भाजपच्या साथीने महाराष्ट्राची सत्ता सांभाळणाऱ्या शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय सुखावणारा आहे. तर उद्धव ठाकरे गटासाठी हा निर्णय अत्यंत धक्कादायक ठरला आहे.
‘Shiv Sena’ party name, ‘Bow and Arrow’ symbol to be retained by Eknath Shinde faction: ECI
Read @ANI Story | https://t.co/Lobu6t0kCv#EknathShinde #Shivsena #BowandArrow #Maharashtra #ECI #UddhavThackeray pic.twitter.com/SmaDZWonIm
— ANI Digital (@ani_digital) February 17, 2023