‘महाराष्ट्र सरकार पिट्ठुंना हाताशी धरुन उद्योगपतींकडून पैसे वसुली करतेय’

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर साधला निशाणा

मुंबई –  मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेले स्फोटकं, मनसूख हिरेन यांची आत्महत्या आणि तपास अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेवरून सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणाचा तपास एनआयए या राष्ट्रीय संस्थेकडे देण्यात आला आहे. मात्र या प्रकरणासंदर्भात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. यावरूनच  अमृता फडणवीस  यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

 

अमृता फडणवीस यांनी ट्विट केले आहे की,’एकीकडे नागपूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी इस्पितळात जागा उरलेली नाही. तर दुसरीकडे ठाकरे सरकार कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे. तसेच आपल्या काही ‘पिट्ठुंच्या’ साथीने उद्योगपतींच्या मनात भय निर्माण करण्याचा प्रयत्न करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहे, असं ट्वीट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं आहे.’ अस म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर जळजळीत टीका केली आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणीत सुरुवातीपासूनच सचिन वाझे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.  त्यांच्या निलंबनाची मागणी भाजपकडून केली जात होती. मनसूख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंवर आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा भाजप नेते आक्रमक झालेलं दिसून येत आहे. भाजप नेते राम कदम यांनी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी ट्विट करत केली आहे. 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.