न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जॉर्जिया राज्यात अटक झाली. 2020 साली झालेली अध्यक्षपदाची निवडणूक उलथवून लावण्याचा कट रचणे आणि फसवणूक असे गंभीर आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
अटक झाल्यावर जेलमध्ये ट्रम्प यांचा कैद्यासारखा फोटो देखील काढण्यात आला. मात्र वीसच मिनिटांत त्यांना दोन लाख डॉलर्सच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आणि मग तिथून ते आपल्या न्यू जर्सीमधील निवासस्थानाकडे रवाना झाले. दरम्यान, त्या अगोदर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी “मी काही चुकीचे केले नाही” अशी प्रतिक्रिया देखील दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जॉर्जिया येथे निवडणूक निकाल बदलण्यासाठी फसवणूक, धमकी देणे आणि बनावटगिरी केल्याचा आरोप आहे. त्यांच्याशिवाय या प्रकरणात आणखी १८ जणांना आरोपी करण्यात आले आहे. इतकेच नाही तर ट्रम्प यांचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मीडोज यांनी दखील आत्मसमर्पण केले आहे. १५ ऑगस्ट रोजी अटलांटा कोर्टाने आरोपपत्र सादर केले. आरोपपत्रात समाविष्ट ४१ आरोपांपैकी १३ आरोपांमध्ये ट्रम्प यांचे नाव आहे.
Fulton county jail in Georgia releases a mug shot following former President Donald Trump’s fourth arrest this year. pic.twitter.com/JwUkA6AwfD
— ANI (@ANI) August 25, 2023
सीएनएनच्या दाव्यानुसार ट्रम्प यांना एका खोलीत घेऊन जात त्यांचे फिंगरप्रींट घेण्यात आले. त्यानंतर त्यांच मगशॉट (चेहऱ्याचा फोटो) देखील घेण्यात आला. हे डॉक्युमेंट्स कोर्ट आणि पोलिस रेकॉर्ड्सचा भाग बनतील. तसेच जेल रेकॉर्ड्सनुसार माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फुल्टन काउंटी येथे तुरुंगात टाकण्यात आले होते. तसेच त्यांना कैदी नंब P01135809 म्हणून जेलमध्ये टाकण्यात आले.
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वर्षातील चौथ्यांदा अटक करण्यात आली. दरम्यान या अटकेनंतर जॉर्जियामधील फुल्टन काउंटी तुरुंगाने ट्रम्प यांचा एक मग शॉट रिलीज केला आहे. कोर्टात ट्रम्प यांना २५ ऑगस्टपर्यंत सरेंडर करण्यासाठी वेळ देण्यात आला होताय अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांच्यावर पाच महिन्या चार क्रिमिनल केस दाखल करण्यात आहेत. त्यांच्या सोबतच व्हाइट हाऊस चे माजी चीफ ऑफ स्टाफ आणि नेते रुडॉल्फ गिउलियानी यांच्यावर देखील केस दाखल करण्यात आली आहे.
इंग्रजी वर्तमान पत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार, चार्जशीटमझ्ये दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने जाणीवपूर्वक निवडणूकांचे निकाल स्वतःच्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात २०२० सालच्या यूएस निवडणुकीचे निकाल बिघडवण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांची चौकशी करणाऱ्या विशेष वकिलाने 45 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.