Mahua Moitra : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामना खेळला गेला. मात्र या सामन्यात ट्रेव्हिस हेडने ठोकलेल्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत विश्वषचकावर नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघाने २४० धावांवर शरणागती पत्करली. दरम्यान, भारताने दिलेले आव्हान ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट गमावत २४१ धावा काढत पूर्ण केले आणि भारताला पराभूत केले.
विश्वचषकाच्या अंतिम सामान्यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपाला चिमटा काढला आहे, यासाठी त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत “जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भारतीय संघाचा पराभव झाला,” असे म्हणत महुआ मोईत्रा यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
In other news:
Ahmedabad Stadium has been renamed – India loses World Cup finals at Jawahar Lal Nehru Cricket Stadium.
And.. pic.twitter.com/oCaD4w6XqK— Mahua Moitra (@MahuaMoitra) November 19, 2023
पुढे महुआ मोईत्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये,“अहमदाबादमधील स्टेडियमचं नाव बदललं. जवाहरलाल नेहरू क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पराभव झाला.” दुसऱ्या पोस्टमध्ये महुआ मोईत्रा म्हणाल्या, “ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाने ( ईडी ) छापेमारी केली.” असा खोचक टोला लगावला आहे.
दरम्यान, महुआ मोईत्रा यांनी केलेल्या टीकेला अजून भाजपकडून कोणतेही उत्तर आले नाही. मात्र भाजपला काढलेल्या चिमट्यावर आता नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.