World Cup 2023 Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (India vs Australia Ahmedabad) तब्बल सव्वा लाख क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. सामना सुरू होण्यापूर्वी तमाम देशवासियांना भारताच्या विजेतेपदाची उत्कंठा लागली होती. एकेक फलंदाज बाद होत गेले व भारताची धावसंख्या ऑस्ट्रेलियाने रोखली (India vs Australia).
या धावांचा पाठलाग करताना ट्रेव्हीस हेडने शतक तर मार्नस लेबुशेनने अर्धशतक फटकावले व विजय खेचून आणला व त्याच क्षणी केवळ मैदानात उपस्थित असलेल्यांचीच नव्हे तर संपूर्ण देशवासियांची निराशाच झाली. 2003 सालच्या स्पर्धेचीच जणू पुनरावृत्ती ऑस्ट्रेलियाने केली असेच आता म्हणावले लागेल.
दरम्यान, काल विश्वचषकाचा हायहोल्टेज सामना पाहण्यासाठी बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी अहमदाबादमधील स्टेडियमवर उपस्थित होते. यादरम्यान माजी क्रिकेटर हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushka sharma) आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्याबद्दल वादगस्त विधान केल्याचं पाहायला मिळालं आहे. हरभजनच्या या वक्तव्यावरून त्याला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे.
कॉमेंट्री करताना हरभजनने विराट कोहलीची पत्नी अनुष्का आणि केएल राहुलची पत्नी अथिया यांच्याबद्दल टिप्पणी केली. मॅचदरम्यान जेव्हा कॅमेरा अनुष्का आणि अथियाकडे फिरला, तेव्हा दोघीजणी एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसल्या होत्या. यावर कॉमेंट्री करताना हरभजन म्हणाला, “मला असं वाटतंय की कदाचित या दोघी चित्रपटांविषयी गप्पा मारत असतील.
Typical Harbhajan Singh L. Disgrace as a person. “Filmo ki baat ho rahi hogi ya cricket ki- Pata nahi cricket ki kitni samaj hogi.
Pathetic. pic.twitter.com/oUhxG13aFS
— Areyyyyy Yaarrrrrr (@A_niche11) November 19, 2023
कारण अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी यांना क्रिकेटविषयी फारसं काही समजत नसेल…’ त्याच्या याच वक्तव्यांवरून नेटकऱ्यांनी ट्रोलिंग करण्यात सुरुवात केली. मात्र, हरभजनच्या या वक्तव्यावर अद्याप अनुष्का किंवा अथियाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.
“महिलांना क्रिकेट समजत नाही, असं तुला म्हणायचं आहे का? या वक्तव्यावर ताबडतोब माफी माग’, ‘हरभजन सिंगने केलेलं हे वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती’. असं सध्या नेटकरी बोलताना दिसत आहेत. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.