shreyas talpade : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने (shreyas talpade) मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटात अल्लू अर्जूनला श्रेयसने हिंदी आवाज दिला.
त्यावेळी त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. दरम्यान, आता श्रेयस त्याच्या आगामी ‘अजाग्रत’ या हिंदी चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात कन्नड अभिनेत्री राधिका कुमारस्वामी प्रमुख भूमिकेत असून सुनील, राव रमेश, जगपती बाबू, आदिथ्य मेनन, देवराज, अच्युत कुमार, साई कुमार, समुद्र कानी, मोहन लाल यांच्यासह अन्य कलाकार आहेत.
View this post on Instagram
अॅक्शन थ्रिलर अशा या चित्रपटाचे कथानक अनपेक्षितरीत्या उलगडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हा चित्रपट सिनेरसिकांसाठी अतिशय खास ठरणार आहे.
या चित्रपटासाठी दिग्दर्शक शशिधर यांनी विशेष मेहनत घेतली असून या चित्रपटाच्या माध्यमातून ते बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. रवी राज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘अजाग्रत’ मधील राधिका कुमारस्वामी यांच्या व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात होते. हिंदीसह सात वेगवेगळय़ा भाषांमध्ये प्रदर्शित होणारा श्रेयस तळपदेचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणार आहे.