नवी दिल्ली : दि ब्राम्होस या संपूर्ण भारतीय बनावटीच्या क्रुझ क्षेपणास्त्राची आज ओदिशातल्या चंदीपूर इथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) आणि ब्रह्मोस एरोस्पेस यांनी बालासोरच्या एकात्मिक चाचणी रेंज (आयटीआर) वरून 290 कि.मी. पर्यंत माऱ्याची क्षमता असलेले हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र संयुक्तपणे प्रक्षेपित केले.
सकाळी 10.20 वाजता घेण्यात आलेल्या या चाचणीने सर्व निकषांची पूर्तता केली, असे संरक्षण निवेदनात म्हटले आहे. हे क्षेपणास्त्र जमीन तसेच समुद्रातल्या प्लॅटफॉर्मवरूनही सोडले जाऊ शकते, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले. या क्षेपणास्त्राच्या 450 किलोमीटरच्या पहिल्या विस्तारित आवृत्तीची यशस्वी चाचणी 11 मार्च 2017 रोजी घेण्यात आली होती.
या क्षेपणास्त्रासाठी स्वदेशी सामग्रीचा वापर झाल्यामुळे संरक्षण क्षमता वृद्धींगत झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी “डीआरडीओ’च्या चमुचे आणि संबंधितांचे अभिनंदन केले. “डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी आणि डीजी, मिसाईल्स आणि स्ट्रॅटेजिक सिस्टम्स, एमएसआर प्रसाद यांनीही क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर त्यांच्या शुभेच्छा दिल्या. भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे ब्राम्होस विकसित केले आहे.