उमेदवारांसाठी एक खिडकी

 जामखेड: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून त्या अनुषंगाने २२७ कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या जाहीर सभा, बैठका, मेळावे मिरावणुका, रोड शो, तात्पुरते प्रचार कार्यालय,वाहनांवर किंवा सभेच्या ठिकाणी ध्वनिक्षेपक लावणे, खाजगी तसेच सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर लावणे यासह वाहन परवाने आणि परवानगी कर्जत तहसील कार्यालयातून एक खिड़की कक्षामधुन देण्यात येतील. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्या अनुषंगाने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या जाहीर सभा, बैठका,मेळावे मिरावणुका, रोड शो ,रैली यासह वाहन परवाना यांची आवश्यकता भासणार आहे. या वेगवेगळ्या परवानगीसाठी सर्वच प्रमुख कार्यालयात जावे लागत असल्याने भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कमीत वेळेत सर्व परवानगी एकाच खिडकी कक्षामधून देण्यात याव्यात असे सूचित केले आहे. त्या अनुषणगाने २२७ कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी नवीन तहसील कार्यालय कर्जत येथून एक खिड़की कक्षामधून विविध परवाने देण्यात येणार आहे.

यासाठी सबंधित राजकीय पक्षांच्या लेटरपैड वर अधिकृत प्रतिनिधीच्या सहीने विहित अर्ज करने बंधनकारक आहे. सदर अर्ज सकाळी १० ते सायं ५ वाजेपर्यंत प्रत्यक्ष स्विकारले जातील. तसेच प्रत्येक सभा, मिरावणुका, वाहन परवाण्यासाठी स्वंतत्र अर्ज करने आवश्यक असून ते नियोजन कालावधीच्या किमान दोन दिवसापूर्वी करने आवश्यक आहे. यासह वरील सर्व परवाने सुविधा एपचा वापर करून किंवा https://suvidha.eci.gov.in या संकेतस्थळ वरून ऑनलाइन स्वरूपात प्राप्त करता येतील अशी माहिती कर्जतच्या प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.