मुंबई – अवघ्या २ दिवसांमध्ये ब्रम्हास्त्रने १०० कोटींच्या कमाईचा टप्पा पार केल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने चित्रपटाच्या निर्मात्यांवर काही आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडला ब्लॉकबस्टर चित्रपटाची प्रतीक्षा होती. त्यात ब्रम्हास्त्रने चांगली कमाई केली. मात्र अभिनेत्री कंगनाने कमाईचे हे आकडे खोटे असल्याचा आरोप निर्मात्यांवर केला आहे.
कंगनाने रविवारी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर ब्रह्मास्त्र बद्दल पोस्ट करत रिलीजच्या अवघ्या दोन दिवसांत चित्रपट हिट झाल्याच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली. कंगनाने लिहिले, “शुक्रवारी आणि रविवारी रिलीज झालेला हा चित्रपट खूप हिट ठरला आहे आणि नफाही कमावला आहे. हा हा हा…. रु. 250 कोटी (तोही एक खोटा आकडा). VFX सह 650 कोटींच्या बजेटने हा चित्रपट बनवला आहे. प्राइम फोकस सह-निर्माता आहे याचा अर्थ असा नाही की VFX ची किंमत नाही. गणितज्ञ करण जोहरचे गणित… आपल्यालाही शिकावे लागेल.
पुढच्या पोस्टमध्ये, कंगनाने बॉक्स ऑफिस इंडियाने केलेले ट्विट शेअर केले आणि लिहिले, “हे बॉक्स ऑफिस इंडिया हँडल मला आणि माझ्यासारख्या अनेकांना त्रास देत आहे. कारण ते माफियाच्या पेरोलवर आहे… आज त्याने ब्रह्मास्त्रला खूप हिट घोषित केले. एका दिवसात, त्याच्या म्हणण्यानुसार चित्रपटाने आतापर्यंत फक्त 65 कोटी रुपये कमावले होते. यानंतर कंगनाने मणिकर्णिका तसेच थलायवी सारख्या आपल्या चित्रपटांना कसे फ्लॉप घोषित केले याबाबत देखील भाष्य केले आहे. मी गुप्तपणे कट रचत नाही, मी पाठीत वार करत नाही. मी खुलेपणाने आणि प्रामाणिकपणे आव्हान देते असंही कंगनाने यावेळी म्हटले.
कंगनाने तिच्या शेवटच्या पोस्टमध्ये करण जोहरची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त करताना लिहिले, “मला करण जोहरची मुलाखत घ्यायची आहे आणि समजून घ्यायचे आहे की तो ब्रह्मास्त्रच्या एकूण कलेक्शनची घोषणा का करत आहे ? तसेच ६५० कोटींचे बजेट असलेल्या चित्रपटाने ६० कोटी कमावले की तो हिट कसा ? चित्रपट माफियांसाठी निसर्गाचे कायदे वेगळे आहेत आणि आमच्यासारख्या माणसांसाठी वेगळे आहेत असे देखील कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.