नगर – मराठा समाज आरक्षण मागणीवरुन शिर्डी येथे होणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर सकल मराठा समाजाने बहिष्कार टाकला आहे. त्याची धग, तालुक्याच्या अनेक गावात सभेला जाण्यास आलेल्या बसेस गावागावातून रिकाम्या पाठविण्यात आल्या.
शिर्डी येथे होणार्या कार्यक्रमासाठी नगर जिल्ह्यातून 300 बस तर नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे जिल्ह्यातून 700 बस अशा एकूण 1 हजार बस चे नियोजन प्रशासनाने केले होते. मात्र मराठा आरक्षाणा साठी होत असलेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यातून सुमारे 40 बस रिकाम्या पाठविण्यात आल्या. तर दोन ठिकाणी बस च्या काचा फोडल्या असल्याचे समजते.
नगर शहरातील तारकपूर आगाराची बस तहसील कार्यालयासमोर अडविण्यात आली. तर शेवगाव तालुक्यातील कोळगाव येथे एसटी बसच्या काचा फोडून मराठा समाजाच्या आक्रमक पवित्र्यानंतर अनेक गावांतील रिकाम्या बसेस माघारी पाठविण्यात आल्या आहेत, काही ठिकाणी पोलिसांनी मध्यस्तीकरत वाद मिटवला.
तसेच शेवगाव तालुक्यातील कोळगाव शिवारात राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एमएच 14 बीटी 2158 हिच्या काचा अज्ञात व्यक्तींनी फोडल्या. त्यानंतर चालक पी.पी. शिंदे यांनी बस चालवत शेवगाव आगारात आणून उभी केली. मराठा समाज आरक्षण मागणीवरुन शिर्डी येथे आज होणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर सकल मराठा समाजाने बहिष्कार टाकला आहे.
कोळगाव येथे बसच्या काचा फोडण्यात आल्यानंतर रिकाम्या सुमारे 40 बसेस पाथर्डी रोडवरील तहसील कार्यालयाजवळ असणार्या शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात लावण्यात आल्या आहेत. तालुक्यात शेवगावसह इतर आगाराच्या 56 एसटी बसेसची सुविधा करण्यात आली होती. मात्र सकाळी साडेदहा वाजेपर्यंत जवळपास 50 बसेस परत पाठविण्यात आल्या. गावागावात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरुण आक्रमक झाला होता. त्यांनी गावात सभेसाठी जाणार्या बसेसला अडवले.
शिर्डी येथील कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून 1 हजार बस चे नियोजन करण्यात आले होते. मात्र जिल्ह्यात दोन ठिकाणी अज्ञात व्यक्तीने बस च्या काचा फोडल्या आहेत. तर सुमारे 40 बसेस गावातून मागे आल्या असल्याचे समजते.
मुकुंद नगराळे, यंत्र अभियंता चालन, अ. नगर