नेवासा । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नुकतीच गुरुवारी सकाळी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शिर्डी मतदार संघाची उमेदवारी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना देण्याची मागणी या शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंञी शिंदे यांच्याकडे केली आहे.
शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे हे या मतदार संघातून दोनदा विजयी आहे. शिर्डी येथे सर्वसामान्य जनतेशी खासदार लोखंडे यांची नाळ जोडली गेलेली असून महायुतीच्या जागा वाटपात फेरफार न करता ही जागा सेनेकडेच ठेवून पुन्हा खासदार लोखंडे यांनाच उमेदवारी देण्याची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंञी शिंदे यांची भेट घेवून केलेली आहे.
खासदार लोखंडे यांनी आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात मतदार संघातील ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी मोठी मेहनत घेतलेली असून त्यांनी या मतदार संघात मोठी विकास कामे केलेली आहे.
या मतदार संघातील ते विद्यमान खासदार असून अशा अवस्थेत ही जागा महायुतीकडून सेनेकडेच ठेवून पुन्हा खासदार लोखंडे यांनाच उमेदवारी देण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार,जिल्हा उपप्रमुख भगवान गंगावणे,नेवासा तालुका प्रमुख सुरेश डिके,नेवासा शहरप्रमुख बाबा कांगुणे,संजय पवार,युवा सेनेचे शुभम उगले यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी उपस्थित होते.