नवी दिल्ली – ट्रायलशिवाय लवलीना बोर्गोहेनचा महिला जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी भारतीय मुष्टियुद्ध संघात समावेश केल्यावरून भारतीय मुष्टियुद्ध महासंघाविरुद्ध दावा दाखल केलेल्या मुष्टियुद्धपटू अरुंधती चौधरीला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
टर्कीमध्ये होणाऱ्या महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी ऑलिम्पिक पदक विजेती लवलिना बोर्गोहेन हिला भारतीय संघात स्थान दिले गेले होते. त्यानंतर अरुंधतीने महासंघाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते.
दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सुनावणीवेळी अरुंधतीच्या बाजूने निर्णय देताना लवलिना आणि अरुंधती यांच्यात ट्रायल घ्यावी व नंतरच खेळाडूंची निवड करावी, असे आदेश न्यायालयाने महासंघाला दिले आहेत.
दोघींमध्ये होणाऱ्या ट्रायल लढतीमध्ये जिंकणाऱ्या खेळाडूला 70 किलो वजनी गटात सहभागी करावे, असे या आदेशात म्हटले आहे. अरुंधती या ट्रायलसाठी सज्ज असून अद्याप बोर्गोहेनने आपली भूमीका जाहीर केलेली नाही.