कराड : ओगलेवाडी येथील रेल्वे कर्मचारी बाधित झाला आहे. या दोन रूग्णात रविवारी भर पडली. कराड तालुक्यातील करोना बाधितांची संख्या आता चार वर पोहोचली आहे. चरेगाव येथील रूग्ण दि. 26 मार्च रोजी पुणे-निगडी येथून आला.
दि. 27 मार्च रोजीची त्याची उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून तो घरी गेला. यानंतर त्याला त्रास जाणवू लागल्याने दि. 16 एप्रिल रोजी तो उंब्रजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाला. त्यानंतर त्याला कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. आज रविवार दि. 19 एप्रिल रोजी त्याचे रिर्पोट करोना पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळवले असल्याची माहिती जिल्हा शल्यविकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. रिर्पोची माहिती मिळताच चरेगावात वैद्यकीय पथक दाखल झाले असून गावात जंतूनाषक फवारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच संबंधित रूग्णाच्या घरातील लोकांना त्याब्यात घेतले आहे.
प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी गावास भेट देऊन योग्यत्या उपायोजना हाती घेतल्या आहेत. तसेच बाबरमाची येथील 37 वर्षीय रूग्णाचे करोना रिर्पोट पॉझिटिव्ह आले आहेत. हा रूग्ण तीन आठवड्यापूर्वी नागपूर येथून आलेला आहे. या दोनही बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर पोलिसांनी दोनही गावे सील केली आहेत. यावेळी पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः हून प्रतिबंधक उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
55 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह
पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात काल (दि. 18) रात्री उशिरा तीन संशयितांना दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. याच रुग्णालयात दाखल असलेल्या एका करोनाबाधित रुग्णाचा 14 दिवसांनंतरचा घशातील स्रावाचा दुसरा नमुना बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.