चौकशी अहवालातील तथ्य उघड
लंडन – ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोविडच्या साथीच्या काळात डाऊनिंग स्ट्रीट या पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पार्टीबाबत संसदेची जाणीवपूर्वक दिशाभूल केली असल्याचे “पार्टी गेट’ प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या संसदेच्या समितीने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे.
या अहवालामध्ये आपल्यावर ठपका ठेवण्यात येणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर जॉन्सन यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. संसदीय समितीच्या सदस्यांकडून आपल्या विरोधात आकसाने तपास केला जात असल्याचा आरोप त्यांनी राजीनामा देताना केला होता.
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी हाऊस ऑफ कॉमन्सची जाणीवपूर्वक दिशाभूल केली आणि तसे त्यांनी वारंवार केले. असे समितीने नमूद केले आहे. जनतेसाठी सर्वात जास्त महत्त्व असलेल्या मुद्द्यावरून संसदेची दिशाभूल केल्याचे कोणतीही उदाहरणे आढळून आली नाहीत. जॉन्सन यांनी प्रतिनिधीगृहाच्या नियमांचा भंग देखील केल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.
समितीने त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अत्यंत कडवट शब्दांमध्ये टीका केली आहे आणि जर बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला नसता तर संसदेतून 90 दिवस निलंबित करण्याची आणि “लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याच्या कायद्यांतर्गत’ त्यांच्यावर कारवाईची शिफारस देखील समितीने केली होती.