सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यात करोनाचे संकट दिवसेंदिवस गडध होत चालले आहे. त्यामुळे या युध्दात आघाडीवर असलेल्या पोलिसांचे दररोज थर्मल स्क्रीनिंग करण्याचा निर्णय बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॅ. सागर वाघ यांनी घेतला आहे.
बोरगाव पोलीस ठाणे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या ठाण्यात काम करणार्या पोलिसांचा दररोज हजारो प्रवाशांशी संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांनाही करोनाची भिती वाटत असल्याने त्यांच्यात अस्वस्था पसरत असल्याने बोरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॅ. सागर वाघ यांनी त्यांना मानसिक आधार देण्यासाठी तसेच त्यांची तपासणी व्हावी या हेतूने थर्मल स्क्रिनिंग मशीन खरेदी केली.
त्या मशिनद्वारे पोलीस ठाण्यात ड्युटीवर येणार्या व ड्युटीवरून जाणार्या पोलीस दादांची तसेच तक्रारदारांची तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यात पोलीस ठाणे स्तरावरील हा पहिलाच प्रयोग जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलिसांनी राबवला आहे.